मुंबई -बिग बी अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये करण जोहर, ऋषी कपूर आणि अभिषेक बच्चन पाहायला मिळत आहेत. गाणं गात असताना ऋषी कपूर सारखं कुणीच ओठांची हालचाल करत नाही. नैसर्गिक आणि परिपूर्ण ओठांची हालचालीच कौशल्य हे ऋषी कपूरकडे होते. ऋषीचे गाणे गात असतानाचे हावभावही कुणी विसरू शकत नाही, अशा शब्दांमध्ये बिग बींनी ऋषी कपूरबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ऋषी कपूरचा फोटो शेअर करून काय म्हणाले अमिताभ बच्चन? - रिशी कपूर
अमिताभ आणि ऋषी कपूर यांनी अमर अकबर अँथोनी, नसीबा, कभी कभी या चित्रपटात एकत्र काम केले होते. अलिकडेच रिलीज झालेल्या '१०२ नॉट आऊट' या चित्रपटातही ते शेवटचे एकत्र झळकले होते.
याआधीही अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सिनेजगतामध्ये शोककळा पसरली. मात्र, या दु: खी वातावरणातून चाहत्यांचे लक्ष खेचून घेण्यासाठी रविवारी बिग बी अमिताभ बच्चन यांनी 1977 ला प्रदर्शीत झालेल्या 'अमर अकबर अँथनी' या सुपरहीट चित्रपटातील एक दृश्य प्रदर्शित केले होते. ज्यात ते स्वत: च स्वत: शी संवाद करताना दिसले.
अमिताभ आणि ऋषी कपूर यांनी अमर अकबर अँथोनी, नसीबा, कभी कभी या चित्रपटात एकत्र काम केले होते. अलिकडेच रिलीज झालेल्या '१०२ नॉट आऊट' या चित्रपटातही ते शेवटचे एकत्र झळकले होते.