महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हरिवंशराय बच्चन यांची इच्छा पूर्ण करत बिग बींनी लिहिली भावनिक पोस्ट - अमिताभ बच्चन

अमिताभ यांनी हरिवंशराय बच्चन यांचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी काही भावनिक ओळीदेखील लिहिल्या आहेत.

Big B Remembers Father Harivanshrai Bachchan on Death Anniversary
हरिवंशराय बच्चन यांची इच्छा पूर्ण करत बिग बींनी लिहिली भावनिक पोस्ट

By

Published : Jan 19, 2020, 2:59 PM IST

Updated : Jan 19, 2020, 4:49 PM IST

मुंबई -महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील आणि सुप्रसिद्ध लेखक, कवी हरिवंशराय बच्चन यांची आज पुण्यतिथी आहे. बिग बींनी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अमिताभ यांनी हरिवंशराय बच्चन यांचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी काही भावनिक ओळीदेखील लिहिल्या आहेत.

हरिवंशराय बच्चन यांचे निधन १८ जानेवारी २००३ रोजी झाले होते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आगामी चित्रपट 'चेहरे' चित्रपटातील फोटोदेखील शेअर केले आहेत. तसेच हिच आपल्या वडिलांची इच्छा असती, असे त्यांनी या फोटोवर कॅप्शन दिले आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अमिताभ बच्चन हे 'चेहरे', 'ब्रम्हास्त्र','झुंड' आणि 'गुलाबो सिताबो' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणार आहेत.

Last Updated : Jan 19, 2020, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details