मुंबई- सर्वच शहरांमध्ये सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या भरपूर असते. यातून अपघातही होतात. यावर मात करण्याचा प्रयत्न हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी केला आहे. आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करीत अमिताभ बच्चन यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी खबरदारी म्हणून एक उपक्रम सुरू केलाय. या अंतर्गत त्यांनी झेब्रा क्रॉसिंगवर एलईडी लाईट्स लावले आहेत. सिग्नलनुसार लाला, पिवळा आणि हिरव्या कलरमध्ये हे लाईट्स लागतात. त्यामुळे सिग्नल मोडणाऱ्यांच्या संख्येला आळा बसला आहे.