महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिहारी शेतकऱ्यांच्या मदतीला धावले बिग बी, तब्बल २१०० जणांचे फेडले कर्ज - Abhishek Bachan

अमिताभ बच्चन यांनी आपले दातृत्व पुन्हा दाखवून दिले आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातीलल शेतकऱ्यांचे कर्ज भरुन मदतीचा हात देणाऱ्या बिग बी यांनी यावेळी बिहारी शेतकऱ्यांना मदत केली आहे. तब्बल २१०० शेतकऱ्यांची कर्जे त्यांनी परतफेड केली आहेत.

अमिताभ बच्चन

By

Published : Jun 12, 2019, 4:28 PM IST

Updated : Jun 12, 2019, 4:37 PM IST


मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपले ह्रदय मोठे करीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांची मदत केली आहे. यावेळी अमिताभ यांनी बिहारच्या २१०० शेतकऱ्यांचे कर्ज स्वतः भरले आहे. ही माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिली आहे.

बिग बी लिहितात, ''आश्वासन पूर्ण केले. बिहारमधील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज बाकी होते अशा २१०० शेतकऱ्यांचे कर्ज ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) च्या माध्यमातून परतफेड केले आहे. यातील काही शेतकऱ्यांना जनक ( बीग बी यांचा बंगला ) येथे बोलावून अभिषेक आणि श्वेताच्या हस्ते कागदपत्रे देण्यात आली.''

शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना अभिषेकबच्चन

अमिताभ यांनी या अगोदर लिहिले होते, 'बिहारच्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही भेट आहे.''

शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना श्वेता नंदा - बच्चन

अमिताभ यांनी अशा प्रकारे मदत करण्याचा हा पहिला प्रकार नाही. गेल्या वर्षी त्यांनी उत्तर प्रदेशातील हजार शेतकऱ्यांची कर्जे अमिताभ यांनी परत केले होते. आणखी एक आश्वासन पूर्ण केल्याचे अमिताभ यांनी म्हटलंय.

अमिताभ यांनी पुलवामा येथे वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला होता. महाराष्ट्रातील ३५० शेतकऱ्यांचे कर्जही त्यांनी भरले होते.

Last Updated : Jun 12, 2019, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details