मुंबई -बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे लवकरच रहस्यपट असलेल्या 'चेहरे' या चित्रपटात झळकणार आहेत. तब्बल ५ दशकांपासून त्यांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यांचे भारदस्त व्यक्तीमत्व आणि अभिनयाची लकब आजही चाहत्यांवर प्रभाव पाडते. त्याचमुळे त्यांच्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांना पाहायला मिळतात. अलिकडेच 'बदला' चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता 'चेहरे' या चित्रपटात ते महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील त्यांचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
रहस्यपट असलेल्या 'चेहरे' चित्रपटातील 'बिग बीं'चा लूक प्रदर्शित - emran hashmi
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे लवकरच रहस्यपट असलेल्या 'चेहरे' या चित्रपटात झळकणार आहेत. तब्बल ५ दशकांपासून त्यांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवली आहे.
'चेहरे' चित्रपटात त्यांचा आगळावेगळा लूक पाहायला मिळणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांचे बरेचसे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचा राजेशाही थाट पाहायला मिळतोय. या चित्रपटात 'बिग बी' सोबत इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच या दोघांची जोडी एकत्र चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. तर, आनंद पंडीत हे निर्मिती करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल. 'चेहरे' चित्रपटाशिवाय अमिताभ बच्चन हे 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात देखील दिसणार आहेत.