मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ५० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या या गोल्डन ज्युबली निमित्ताने अभिषेक बच्चन यांनी अमिताभ यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने अमिताभ यांच्यासाठी खास मजकूरही लिहिलाय.
शेअर केलेला फोटो 'सात हिंदुस्थानी' या बच्चन यांच्या पदार्पणाच्या चित्रपटाच्यावेळचा आहे. यात अमिताभ खूप तरुण दिसत आहेत. अभिषेक यांनी लिहिलंय, ''केवळ मुलगा, एक चाहता आणि अभिनेता म्हणूनच नाही तर, आम्हा सर्वांना एका महान व्यक्तीला पाहण्याची संधी मिळाली. यातील बरेच काही कौतुकास्पद, प्रशंसनीय आणि शिकण्यासारखे आहे. आम्ही बच्चनच्या काळापासूनचे आहोत असे सिनेप्रेमींमधील अनेकांना बोलताना पाहिलंय. फिल्म इंडस्ट्रीत ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा, पापा!!. पुढील ५० वर्षे याची वाट पाहू..खूप प्रेम.''