महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मनालीच्या चाहत्यांसाठी बिग बींची खास पोस्ट - ranbir kapoor in brahmastra

'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची टीम बिलासपूर येथील सर्किट हाऊस येथे थांबलेले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य जोडी या चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

Big B expresses gratitude to 'ever-smiling well-wishers' in Manali
मनालीच्या चाहत्यांसाठी बिग बींची खास पोस्ट

By

Published : Dec 5, 2019, 9:32 AM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन काही दिवसांपासून मनालीच्या गोठवणाऱ्या थंडीत आगामी 'ब्रम्हास्त्र'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मनालीच्या निसर्गरम्य परिसरात या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. येथील स्थानिकांनी चित्रपटाच्या टीमचे जोरदार स्वागत केले. तसेच अमिताभ बच्चन यांचेही आदरातिथ्य केले. चाहत्यांच्या या प्रेमासाठी बिग बींनी एक फोटो शेअर करून खास अंदाजात आभार मानले आहेत.

मनाली येथील शूटिंगदरम्यान बिग बींनी चित्रपटाच्या सेटवरुन त्यांचा कुल लूक असलेला फोटो शेअर केला होता. तसेच आताही त्यांनी हिमाचली टोपी घातलेला एक फोटो शेअर केला आहे. आपले हात जोडून त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा -'जयेशभाई जोरदार' म्हणत रणवीर सिंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट लूक रिलीज


'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची टीम बिलासपूर येथील सर्किट हाऊस येथे थांबलेले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य जोडी या चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

यापूर्वी हा चित्रपट या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु व्हीएफएक्स आणि काही तांत्रिक बाबींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'ब्रम्हास्त्र'चे चित्रीकरण बल्गेरिया, न्यूयॉर्क आणि मुंबईमध्येही करण्यात आले आहे. आहे. या चित्रपटात मौनी रॉय आणि टॉलीवूड अभिनेता नागार्जुनही आहेत.

'ब्रम्हास्त्र'शिवाय बिग बी आगामी 'चेहेरे', 'गुलाबो सीताबो' आणि 'झुंड' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा -मनालीच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये महानायकाचं 'ब्रम्हास्त्र' शूट

ABOUT THE AUTHOR

...view details