महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना अमिताभ देणार प्रत्येकी ५ लाख - बिग बी

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४९ जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या कुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत अमिताभ देणार आहेत. ही मदत कशी पोहोचवता येईल यावर ते विचार करीत आहेत.

अमिताभ

By

Published : Feb 16, 2019, 7:22 PM IST

मुंबई - जम्मू आणि काश्मिर येथे पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात सीआरपीएफच्या जवानांना वीरमरण आले होते. यानंतर देशभर दहशतवाद्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली. वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी वीरमरण आलेल्या ४९ जवानांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

ही रक्कम कोणत्या मार्गाने जवानांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचवता येईल याचा विचार अमिताभ करीत आहेत.

अमिताभ यांच्या प्रवक्त्याने याबद्दल बोलताना म्हणाले, "होय, मिस्टर बच्चन सर्व वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देणार आहे. ही मदत पोहोचवण्यासाठी योग्य प्रक्रियेबद्दलचा शोध घेत आहेत."

विराट कोहलीसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. याला अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार होते. मात्र तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तो कार्यक्रम आज ( शनिवारी ) होणार आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details