मुंबई - अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा आगामी 'गुलाबो सिताबो' या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हा सिनमा कधी रिलीज होणार याची चिंता लागून राहिलेली असताना एक आनंदाची बातमी निर्मात्याने दिली आहे. शूजित सरकार यांचा हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. याबातमीला बच्चन आणि आयुष्यमानने दुजोरा दिलाय.
हेही वाचा - शाहरुखच्या गाजलेल्या 'दुसरा केवल'चे दूरदर्शनवर पुन्हा प्रसारण
पीकू या चित्रपटाची लेखिका जूही चतुर्वेदीने लिहिलेला हा 'गुलाबो सिताबो' चित्रपट १२ जूनला प्राईम व्हिडिओवर स्ट्रिमिंग होणार आहे.
याबद्दल बिग बी यांनी म्हटलंय, "'गुलाबो सिताबो' आयुष्याची झलक आहे. ही कहाणी संपूर्ण परिवाराने पाहायला हवी.''
आयुष्मान खुराणासाठी 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट खास आहे. यातून तो दुसऱ्यांदा शूजित सरकारसोबत काम करीत आहे. दुसरे म्हणजे अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचे त्याचे लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण होत आहे. यावर्षाच्या अखेरीस हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे बरीच गणिते बदलली आणि हा सिनेमा आता प्राईम व्हिडिओवर स्ट्रिमिंग होताना दिसेल.
'गुलाबो सिताबो'चे डिजीटल रिलीज होणार असल्यामुळे हा सिनेमा २०० देशामध्ये लोकांना पाहता येणार आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन : आत्मपरीक्षण करण्यासाठी मिळालेली संधी - कॅटरिना कैफ