मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या आगामी 'दुर्गावती' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भूमी पहिल्यांदाच हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.
अक्षय कुमार आणि भूषण कुमार या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट तेलुगू भाषेतील 'भागमती' चित्रपटाचा रिमेक आहे.
अक्षय कुमारने देखील मुहुर्त शॉटचा फोटो शेअर करुन भूमीला चित्रपटासाठी शूभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -जुळ्यांची अनोखी जुगलबंदी 'प्रेमाचा गेम सेम टू सेम'
भूमी पेडणेकरनेही फोटो पोस्ट करून हा चित्रपट तिच्या करिअरमधला खास चित्रपट असल्याचे लिहिले आहे.
विक्रम मल्होत्रा हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. भूमीने काही दिवसांपूर्वीच आयुष्मान खुरानासोबत 'बाला' चित्रपटात भूमिका साकारली आहे. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या रिमेकमध्येही दिसली. याशिवाय 'भूत' चित्रपटातही तिची भूमिका पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -'दुवा मे याद रखना', चाहत्याच्या प्रश्नावर 'किंग खान'ने का दिलं असं उत्तर?