महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भूमी पेडणेकरने सुरू केली 'बधाई दो'ची तयारी - राजकुमार राव

'बधाई दो' चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठीची तयारी भूमि पेडणेकरने सुरू केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हर्षवर्धन कुलकर्णी 'बधाई दो'चे दिग्दर्शन करणार आहेत.

Bhumi Pednekar
भूमी पेडणेकर

By

Published : Oct 24, 2020, 3:35 PM IST

मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या आगामी 'बधाई दो' चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठीची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भूमीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी शेअर केला आहे. तिने लिहिलंय, "बधाई दो, तयारी सुरू."

'बधाई हो' या चित्रपट फ्रँचायझीचा 'बधाई दो' हा दुसरा भाग आहे. अभिनेता राजकुमार राव दिल्लीच्या महिला पोलिस स्टेशनमध्ये काम करणारा एकमेव पुरुष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असणार आहे.

चित्रपटाच्या घोषणेच्या वेळी भूमी म्हणाली, "मी यापूर्वी बर्‍याच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत, पण 'बधाई दो' मधील माझे पात्र खरोखरच खास आहे. जेव्हा मी ही कथा पहिल्यांदा ऐकली तेव्हा मला खूप आवडली. हा एक अतिशय प्रासंगिक विषय आहे आणि खूप मनोरंजक पद्धतीने सादर केला आहे. मी प्रथमच राजकुमार यांच्याबरोबर काम करत आहे, त्यामुळे मी खूप उत्साही आहे."

'बधाई दो' या चित्रपटाची कथा अक्षत घिलडियाल आणि 'बधाई हो' चे लेखक सुमन अधिकारी यांनी लिहिली आहे. हर्षवर्धन कुलकर्णी 'बधाई दो'चे दिग्दर्शन करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details