महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अक्षयच्या आगामी चित्रपटाची घोषणा, भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत - Cape Of Good Films presented DURGAVATI

'दुर्गावती', असे या चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली आहे.

bhumi pednekar lead in DURGAVATI presented by akshay kumar
अक्षयच्या आगामी चित्रपटाची घोषणा, भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत

By

Published : Nov 30, 2019, 1:28 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सलग एकापाठोपाठ एक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा 'हाऊसफुल ४' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर, आगामी 'गुड न्यूज' हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आता यानंतर लगेच त्याने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर ही मुख्य भूमिका साकारणार आहे. तर, अक्षयच्या केप ऑफ गुड फिल्म्सच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

'दुर्गावती', असे या चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.

हेही वाचा -अभिनेत्री उषा जाधव 'ईफ्फी'मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीची मानकरी, बिग बींनी दिल्या शुभेच्छा

अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म्ससोबतच भूषण कुमार यांच्या टी-सीरिजअंतर्गत या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर, विक्रम मल्होत्रा हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

भूमीने अलिकडेच आयुष्मान खुरानासोबत 'बाला' चित्रपटात भूमिका साकारली आहे. आता कार्तिक आर्यनसोबत ती 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या रिमेकमध्येही झळकणार आहे. याशिवाय 'भूत' चित्रपटातही तिची भूमिका पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -अजय देवगनसोबत 'गोलमाल'च्या टीमची पुन्हा धमाल, पुढच्या वर्षी होणार शूटिंगला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details