मुंबई - सिनेसृष्टीतील कलाकराची चाहत्यांमध्ये नेहमीच क्रेझ पाहायला मिळते. आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्याची, त्यांची एक झलक मिळवण्यासाठी किंवा त्यांची एक प्रतिक्रिया मिळवण्यासाठी हे चाहते नेहमी प्रयत्नात असतात. असाच एका चाहत्याचा प्रयत्न फळास आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपल्या चाहत्याला दिलेल्या एका प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळतेय.
भूमीचा 'पती, पत्नी और वो' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. आजवर तिने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या फॅन फोलोविंगची संख्याही मोठी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स पाहायला मिळतात.
हेही वाचा -सलमानच्या नवीन गाण्यावरून वाद; ट्विटरवर ट्रेंड होतोय 'बॉयकॉट दबंग ३' हॅशटॅग
तिच्या अशाच एका चाहत्याने सोशल मीडियावर भूमीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मी तुझा फोटो पाहिला नाही, असा एकही दिवस आत्तापर्यंत गेला नाही. तू खूपच सुंदर आहेस. तू एखादी सर्वसामान्य मुलगी असावी, अशी माझी इच्छा होती. आता तू एक मोठी स्टार आहेस. कितीही प्रेम केले, तरी तू एखाद्या सेलिब्रिटी नसणाऱ्या व्यक्तीशी लग्न करणार नाहीस. याचंच दु:ख आहे'.