मुंबई- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि दंगल गर्ल फातिमा सना शेख लवकरच आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'भूत पोलीस' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे. 'स्त्री' या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर दिग्दर्शकांनी आपला कल हॉरर कॉमेडी चित्रपटांकडे वळवलेला दिसत आहे.
सैफ आणि फातिमा सना शेखच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा - fatima sana shaikh
या चित्रपटात सैफ अली खान आणि फातिमा सना शेखशिवाय अभिनेता अली फजलचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. हा एक ३ डी चित्रपट असणार आहे.
या चित्रपटात सैफ अली खान आणि फातिमा सना शेखशिवाय अभिनेता अली फजलचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. हा एक ३ डी चित्रपट असणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. पवन कृपलानी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर फॉक्स स्टार स्टुडिओजमार्फत चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. 'भूत पोलीस' चित्रपटाच्या निमित्ताने सैफ, फातिमा आणि अली हे त्रिकूट पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे, निश्चितच त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास ठरणार आहे.