महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'भूल भुलैय्या २'मध्ये दिसणार अक्षय कुमारच्या चित्रपटातील २ गाणी - kiara advani in Bhool Bhulaiyaa 2

'अनेकांना हा चित्रपट 'भूल भुलैय्या'चा सिक्वेल वाटतो. मात्र, हा सिक्वेल नसून या चित्रपटाची कथा वेगळी आहे. यामध्ये फक्त मुळ चित्रपटातील दोन गाण्यांचा समावेश राहणार आहे', असे अनिस यांनी सांगितले आहे.

Bhool Bhulaiyaa 2 is completely Original, said Anees bazmee
'भूल भुलैय्या २'मध्ये दिसणार अक्षय कुमारच्या चित्रपटातील २ गाणी

By

Published : Jan 20, 2020, 6:38 PM IST

मुंबई -दिग्दर्शक अनिस बझ्मी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'भूल भुलैय्या' या चित्रपटाची आजही क्रेझ पाहिली जाते. या चित्रपटात अक्षय कुमारसह विद्या बालन, शायनी अहुजा, परेश रावल, अमिषा पटेल यांसोबतच इतरही बरेच कलाकार दिसले होते. आता अनिस बझ्मी 'भूल भुलैय्या २' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीची मुख्य भूमिका आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये कार्तिकचा अक्षय कुमारप्रमाणेच लुक पाहायला मिळाला. मात्र, या चित्रपटाची कथा पूर्णत: वेगळी असल्याचे दिग्दर्शक अनिस बझ्मी यांनी म्हटले आहे. एका माध्यमाशी बोलताना त्यांनी या गोष्टीचा उलगडा केला आहे.

हेही वाचा -विजय देवरकोंडाच्या चित्रपटाची करण जोहर करणार निर्मिती, शूटिंगला सुरुवात

'या चित्रपटाचा बराच भाग हा राजस्थानमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. तर, काही सिनचे शूटिंग हे मुंबईमध्ये झाले आहे. आता जयपूर आणि पुन्हा राजस्थानमध्ये या चित्रपटाचा उर्वरीत भाग शूट करण्यात येणार आहे'.

'अनेकांना हा चित्रपट 'भूल भुलैय्या'चा सिक्वेल वाटतो. मात्र, हा सिक्वेल नसून या चित्रपटाची कथा वेगळी आहे. यामध्ये फक्त मुळ चित्रपटातील दोन गाण्यांचा समावेश राहणार आहे', असे अनिस यांनी सांगितले आहे.

या चित्रपटात तब्बुची खास भूमिका पाहायला मिळणार आहे. कार्तिक आर्यन आणि कियाराने याबाबत माहिती दिली होती.

हेही वाचा -वरुण धवनने श्रद्धासाठी खरेदी केलं खास गिफ्ट

ABOUT THE AUTHOR

...view details