महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘ख्वाडा’, 'बबन' नंतर भाऊसाहेबांचा ‘राजकुमार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! - rajkumar film news

‘राजकुमार’ गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता परिस्थितीत सुधार होताना दिसत असल्यामुळे निर्मात्यांनी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे असे जाहीर केले आहे.

राजकुमार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
राजकुमार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By

Published : Feb 9, 2021, 9:57 AM IST

Updated : Feb 9, 2021, 12:21 PM IST

मुंबई- अभिनेता भाऊसाहेब शिंदे यांना ‘ख्वाडा’ तील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार - स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते व ‘ख्वाडा’ला ही उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतो. साहजिकच अशा अभिनेत्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा असते. भाऊसाहेब शिंदे अभिनित २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला 'बबन' या चित्रपटातील बबन आणि कोमलची प्रेमकहाणी प्रचंड गाजली होती. तसेच या चित्रपटातील गाणीही बरीच लोकप्रिय झाली होती. चित्रपटातील बबन आणि कोमलची म्हणजेच भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधवची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूपच भावली. आता हीच जोडी पुन्हा पडद्यावर 'राजकुमार' या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.


लॉकडाऊनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली
एस आर एफ प्रॉडक्शन प्रस्तुत 'राजकुमार' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केले असून, त्यांचे हे दिग्दर्शनीय पदार्पण आहे. समर्थ यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ‘राजकुमार’ गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता परिस्थितीत सुधार होताना दिसत असल्यामुळे निर्मात्यांनी हा सिनेमा २३ एप्रिल २०२१ ला सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचे असे जाहीर केले आहे.


केजीएफ फेम अर्चना जॉईस यांची भूमिका
भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव यांच्यासोबतच 'राजकुमार'मध्ये प्रवीण विठ्ठल तरडे, देविका दफ्तरदार, राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे आणि अर्चना जॉईस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अर्चना जॉईस यांनी २०१८ ला प्रदर्शित झालेल्या के.जी.एफ.( K.G.F.) या हिंदी चित्रपटामध्ये काम केले असून त्यांचा 'राजकुमार' हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. अद्याप 'राजकुमार' सिनेमाची कथा गुलदस्त्यात असली तरी चित्रपटाच्या पोस्टरवरून सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

Last Updated : Feb 9, 2021, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details