मुंबई -अभिनेता इमरान हाश्मी लवकरच डिजीटल व्यासपीठावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बार्ड ऑफ ब्लड' असे त्याच्या पहिल्याच वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजमध्ये तो गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा पहिला लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजमध्ये इमरानसोबत विनीत कुमार सिंग, शोभिता धुलीपाला, क्रिती कुल्हारी आणि रजीत कपूर हे कलाकार झळकणार आहेत.
दिग्दर्शक रिभू दासगुप्ता हे या वेबसीरिजचे दिग्दर्शन करत आहेत. तर, शाहरुख खानच्या रेड चिली अंतर्गत या वेबसीरिजची निर्मिती होत आहे. ही वेबसीरिज बिलाल सिद्दीकी यांच्या २०१५ मध्ये आलेल्या पुस्तकावर आधारित आहे.