मुंबई- प्रकाश पवार दिग्दर्शित 'बलोच' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पानिपतच्या लढाईनंतरचं सत्य या चित्रपटातून दाखवण्यात येणार असून नुकतंच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
पानिपतच्या लढाईनंतरचं सत्य सांगणाऱ्या 'बलोच' सिनेमाचं टीझर पोस्टर लाँच - bhaurao karhade
मराठ्यांच्या इतिहासातील मोठी जखम म्हणजे पानिपतचा पराभव. या पराभवानंतर आपल्या मावळ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावे लागले
![पानिपतच्या लढाईनंतरचं सत्य सांगणाऱ्या 'बलोच' सिनेमाचं टीझर पोस्टर लाँच](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2781825-459-946f620c-d476-4129-a53b-d61ef5a35fcf.jpg)
सिनेमाची अजून एक खास गोष्ट म्हणजे, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर रोहित आवाळे आणि विशाल निकम हे नव्या दमाचे कलाकारसुद्धा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
"बलोच" या सिनेमाचे शूटिंग जून महिन्यात राजस्थानमध्ये सुरू होणार आहे. मराठ्यांच्या इतिहासातील मोठी जखम म्हणजे पानिपतचा पराभव. या पराभवानंतर आपल्या मावळ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावे लागले. याच सैनिकांची शौर्यगाथा म्हणजे‘बलोच’सिनेमा असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले आहे. चंद्रभागा प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती जीवन जाधव आणि जितेश मोरे करणार आहेत.