आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीमगर्ल' नंतर 'बाला'चंही शतक
यावर्षी आयुष्मानचे कॉमेडी मात्र, सामाजिक संदेश देणारे 'ड्रीमगर्ल' आणि 'बाला' हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सुरूवातीपासूनच आयुष्मान त्याच्या हटके स्क्रिप्टसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याचे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला.
मुंबई -अभिनेता आयुष्मान खुरानाची यंदाही बॉक्स ऑफिसवर छाप पाहायला मिळाली. मागच्या वर्षीप्रमाणेच आयुष्मानने यंदाचे वर्षही गाजवले. त्याचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'ड्रीमगर्ल' हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यापाठोपाठ आता त्याचा 'बाला' चित्रपटाचीही १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे.
मागच्या वर्षी आयुष्मान खुरानाचे 'अंधाधून' आणि 'बधाई हो' या दोन्ही चित्रपटांनी १०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली होती. 'अंधाधून' चित्रपटातील भूमिकेसाठी आयुष्मानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे.