मुंबई -दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच हिंदी सिनेसृष्टीवरही छाप पाडणारा चित्रपट म्हणजे 'बाहुबली'. अभिनेता प्रभासची याच चित्रपटानंतर जगभरात लोकप्रियता वाढली. सिनेसृष्टीत अनोखा विक्रम रचत या चित्रपटाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'बाहुबली - द बिगिनिंग' नंतर 'बाहुबली - द कन्क्लुजन' या चित्रपटानेही दमदार यश मिळवले. आता लंडनमध्येही या चित्रपटाने छाप पाडली आहे.
१९ ऑक्टोबरला लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये 'बाहुबली'च्या पहिल्या भागांच स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. १४८ वर्ष जुन्या असलेल्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये 'बाहुबली' हा पहिला पहिला नॉन-इंग्लिश चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे हा मानाचा तुरा देखील बाहुबलीच्या शिरपेचात रोवला गेला आहे.
हेही वाचा -||लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु|| प्रसिद्ध गायिका लेडी गागाने टि्वट केला संस्कृत श्लोक