मुंबई -सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करणारा शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य स्पर्धक सहभागी होत असतात. आपल्या ज्ञानाच्या बळावर करोडपती बनण्याचं स्वप्न उराशी बाळगुन या कार्यक्रमात हजेरी लावतात. अमरावतीच्या अशाच एका सर्वसामान्य गृहिणी असलेल्या बबिता ताडे यांनी या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्या करोडपती झाल्या आहेत.
सध्या 'कौन बनेगा करोडपती'चं अकरावं पर्व सुरू आहे. बबिता ताडे या अमरावतीच्या रहिवासी आहेत. त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवण्याचं काम करतात. या कामातून त्यांना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात. मात्र, एक खिचडी बनवणारी गृहिणी देखील आपलं स्वप्न पूर्ण करू शकते, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. आपल्या ज्ञानाच्या बळावर त्यांना हॉटसिटवर बसण्याची संधीदेखील मिळाली. आपल्याला मिळालेल्या याच संधीचं सोनं करत त्यांनी करोडपती होण्याचा मिळवला आहे.