मुंबई - अभिनेता भाऊसाहेब शिंदे याचा मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला 'बबन' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री गायत्री जाधव हीदेखील झळकली होती. या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. तसेच, भाऊसाहेब आणि गायत्रीच्या जोडीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव आणि अर्चना जॉईस यांची भूमिका असलेला 'राजकुमार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नव्या रुपात, नव्या ढंगात 'बबन'ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांनाही या चित्रपटाची उत्सुकता आहे.