मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बाबा' या मराठी सिनेमाची तो निर्मिती करणार आहे. नुकतंच चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्यात प्रेक्षकांना वडील आणि मुलाची झलक पाहायला मिळाली.
संजय दत्तच्या 'बाबा'मधून ‘तनू वेडस मनू’मधील 'हा' अभिनेता करणार मराठीत पदार्पण - tanu weds manu
'बाबा' या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाच्या स्टारकास्टविषयीची माहितीही समोर आली आहे.
आता या चित्रपटाच्या स्टारकास्टविषयीची माहितीही समोर आली आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि ‘तनू वेडस मनू’मध्ये भूमिका बजावलेला दीपक दोब्रियाल हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल. हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. यापूर्वी माधुरी दिक्षितच्या ‘बकेट लिस्ट’या सिनेमाच त्यांनी सह-दिग्दर्शन केलं होते. तसेच ‘धागा’ या मराठी लघुपटाचे दिग्दर्शनही केलं होतं. चित्रपटाबद्दल राज गुप्ता म्हणाले, भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणीवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करतं, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा आहे. सिनेमाची कथा कोकणात घडत असून वडील मुलाच्या नात्यावर आधारित अशी अतिशय हृदयस्पर्शी कथा या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न या टीमनं केला आहे.