महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पत्नीने आत्महत्या केल्यामुळे 'बाहुबली' फेम मधु प्रकाश गजाआड - wife commits suicide

पत्नीने आत्महत्या केल्यामुळे 'बाहुबली' फेम मधु प्रकाश गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात दाखल केले. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. हैदराबाद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मधु प्रकाश

By

Published : Aug 8, 2019, 1:23 PM IST


हैदराबाद - 'बाहुबली' चित्रपटातील कलाकार मधु प्रकाश याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. त्याची पत्नी भारती हिने गळफास लावून आत्महत्या केली होती. पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप त्याच्या सासऱ्याने केलाय.

''मंगळवारी भारती हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो आणि मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात दाखल केला,'' असे रायदुर्गम पोलीस ठाण्याचे सर्कल इन्स्पेक्टर रविंद्र यांनी सांगितले.

मधु प्रकाश हा भारतीचा हुंड्यासाठी छळ करीत होता. तो तिला मारहानही करायचा, अशी तक्रार भारतीचे वडील यांनी केलीय. मधुने एस एस राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटात भूमिका केली होती. त्याचा भारतीसोबत २०१५ मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून दोघेही एकत्र राहात होते.

पोलिसांनी कलम ३०४ बी अंतर्गत मधु प्रकाश याच्यावर एफआयआर दाखल झाली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details