मुंबई -आयुष्मान खुराना आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची पत्नी ताहिरा कश्यप हिने एक रोमॅन्टिक पोस्ट शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ताहिरासोबतच बॉलिवूडच्या इतर कलाकारांनीही आयुष्मानवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आयुष्मानच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे अभिनेता विकी कौशलने आयुष्मानसोबतचा एक फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच त्याच्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहे.
हेही वाचा -अॅक्शन टिझर : पाहा, श्वास रोखून धरणारी दृष्ये आणि जीव धोक्यात घालणारा पाठलाग
'ड्रीम गर्ल' चित्रपटात आयुष्मानसोबत झळकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा हिनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज कुमार रावने आयुष्मानसोबत 'बरेली की बर्फी' चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यानेही ट्विटरवरुन आयुष्मानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री भूमी पेडणेकरने आयुष्मानसोबत 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात भूमिका साकारली होती. तिनेही आयुष्मानसोबतचा एक फोटो शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
भूमी पेडणेकर आणि आयुष्मान
हेही वाचा -Bday Spl: 'विकी डोनर' ते 'ड्रीमगर्ल', पाहा आयुष्मानचा फिल्मी प्रवास
'दंगल गर्ल' अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिनेही आयुष्मानला शुभेच्छा दिल्या आहेत. ती त्याच्यासोबत 'बधाई हो' चित्रपटात झळकली होती.
सान्या मल्होत्रा आणि आयुष्मान
गायक बादशाह आणि भूषण कुमार यांनीही आयुष्मानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -आयुष्य तुझ्यासोबत आणखीच सुंदर वाटतं, ताहिराची आयुष्मानसाठी पोस्ट