मुंबई -तब्बल २० वर्षानंतर यंदाचा आयफा अवार्ड्स (द इंटरनेशन इंडियन फिल्म अकेडमी अवॉर्ड्स) सोहळा भारतात रंगला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. 'आयफा' पुरस्काराच्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांनी आपल्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांचे लक्ष वेधले.
यावेळी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा-देशमुख यांच्या जोडीने सर्वांची मने जिंकली.
दोघेही नेहमीप्रमाणे आपल्या स्टायलिश अंदाजात पाहायला मिळाले.
तर, आयुष्मान खुरानाने त्याची पत्नी ताहिरा कश्यप हिच्यासोबत हजेरी लावली होती.
हेही वाचा -आयफा अवार्ड्स २०१९: आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणवीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता