महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ड्रीम गर्ल'चा ट्रेलर पाहून चाहते आयुष्मानच्या प्रेमात, सोशल मीडियावर धुमाकूळ - ड्रीमगर्ल

या चित्रपटात आयुष्मानसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा देखील झळकणार आहे. पण, 'ड्रीमगर्ल' म्हणून आयुष्मानच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते अक्षरश: आयुष्मानच्या प्रेमात पडले आहेत.

'ड्रीम गर्ल'चा ट्रेलर पाहून चाहते आयुष्मानच्या प्रेमात, सोशल मीडियावर धुमाकुळ

By

Published : Aug 13, 2019, 8:26 AM IST

Updated : Aug 13, 2019, 8:54 AM IST

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुराना बॉलिवूडमध्ये त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटासाठी ओळखला जातो. दमदार कथानक आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर आयुष्मानने आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवले आहे. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आयुष्मान पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या आगामी 'ड्रीमगर्ल' चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या चित्रपटात आयुष्मानसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा देखील झळकणार आहे. पण, 'ड्रीमगर्ल' म्हणून आयुष्मानच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते अक्षरश: आयुष्मानच्या प्रेमात पडले आहेत. आत्तापर्यंत या ट्रेलरवर ११ मिलीयनपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. तर, यूट्यूबच्या टॉप १० ट्रेण्डींग व्हिडिओमध्ये या ट्रेलरची वर्णी लागली आहे.

आयुष्मानच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरही चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. त्याच्या अभिनयाचंही चाहत्यांनी भरभरुन कौतुक केलंय. आयुष्मानला अलिकडेच त्याच्या 'अंधाधून' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यामुळे चाहत्यांनीही तो या पुरस्काराचा खरा मानकरी असल्याचे म्हटले आहे.

'विकी डोनर', 'दम लगाके हैशा', 'शुभ मंगल सावधान', 'बधाई हो', 'अंधाधून', यांसारख्या चित्रपटातून आयुष्मानने प्रेक्षकांची मने तर जिंकली. मात्र, 'आर्टिकल १५' सारख्या गंभीर विषयावर आधारित असलेल्या चित्रपटातही त्याने त्याच्या अभिनयाची झलक दाखवून दिली. आता 'ड्रीमगर्ल' चित्रपटातून पुन्हा एकदा तो वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Last Updated : Aug 13, 2019, 8:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details