मुंबई - बॉलिवूडमध्ये आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारणारा आयुष्मान खुराना लवकरच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा आगामी 'आर्टिकल-१५' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून तो मुंबईला परतला आहे. 'मुल्क' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
आयुष्मानच्या 'आर्टिकल-१५'चे शूटिंग पूर्ण, पहिल्यांदाच साकारणार पोलिसाची भूमिका - bala
आयुष्मानचा मागच्या वर्षी 'अंधाधून' आणि 'बधाई हो' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. या दोन्हीही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. आता यावर्षी तब्बल ३ चित्रपटांमध्ये तो झळकणार आहे.
आयुष्मानने अलिकडेच या चित्रपटाबाबत एक ट्विट केले होते. 'हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वात प्रासंगिक आणि महत्वपूर्ण चित्रपट आहे', असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले होते. या चित्रपटात आयुष्मान व्यतिरीक्त ईशा तलवार, मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा, एम. नास्सर, आशीष वर्मा आणि जीशान अयूब हे कलाकार भूमिका साकारणार आहे.
आयुष्मानचा मागच्या वर्षी 'अंधाधून' आणि 'बधाई हो' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. या दोन्हीही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. आता यावर्षी तब्बल ३ चित्रपटांमध्ये तो झळकणार आहे. 'आर्टिकल-१५' शिवाय 'ड्रीम गर्ल' आणि 'बाला' या चित्रपटांसाठी त्याची वर्णी लागली आहे.