महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तू आलीस अन् माझं आयुष्य बदललं', आयुष्मानची ताहिरासाठी खास पोस्ट - ताहिरा कश्यप वाढदिवस

आयुष्मानने ताहिराचा एक जुना फोटो पोस्ट करून त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Ayushmann Khurrana wishes wife Tahira in most adorable way on b'day
आयुष्मानची ताहिरासाठी खास पोस्ट

By

Published : Jan 21, 2020, 5:47 PM IST

मुंबई -अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि निर्माती ताहिरा कश्यपचा आज वाढदिवस आहे. आयुष्मान आणि ताहिरा हे बॉलिवूडमधील एक कपल गोल मानलं जातं. ताहिराच्या वाढदिवसानिमित्त आयुष्मानने तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आयुष्मानने ताहिराचा एक जुना फोटो पोस्ट करून त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'ताहिरा म्हणजे शुद्ध आणि आभासी. तू अगदी तशीच आहेस. हा तुझा मुंबई शहरात आणि माझ्या आयुष्यात पहिला दिवस होता. संतोष जो आपल्या घरात काम करत होता तो सुट्टीवर होता. त्यानंतर संपूर्ण दिवस आपण घर साफसफाई कण्यात घालवला होता. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं संपूर्ण आयुष्य बदललं', असे लिहून आयुष्मानने ताहिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -दिलीप वेंगसरकरांच्या भूमिकेत मराठमोळा आदिनाथ कोठारे, पाहा '८३'ची संपूर्ण टीम

२००८ साली ताहिरा आणि आयुष्मानने लग्नगाठ बांधली होती. त्यांना विराजवीर हा मुलगा आणि वरुष्का ही मुलगीदेखील आहे.

ताहिराने मागच्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरशी मोठ्या हिमतीने लढा दिला. तिच्या या लढाईत आयुष्मानने तिला मोलाची साथ दिली.

आयुष्मानने ताहिराच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशनही केले. या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ आयुष्मानची सहकलाकार अभिनेत्री नुसरत भरुचाने आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये शेअर केले आहेत.

ताहिराच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

ट्विंकल खन्ना, यामी गौतम, सोनाली बेंद्रे आणि राजकुमार राव यांच्यासह बऱ्याच सेलिब्रिटींनी ताहिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -'गंगुबाई'च्या शूटिंगपूर्वीच आलिया भट्ट जखमी, पोस्ट शेअर करून दिली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details