मुंबई -'ड्रीमगर्ल' चित्रपटानंतर अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा नवी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या 'बाला' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टक्कल असलेल्या व्यक्तीची प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
'बाला' चित्रपटाच्या टीजरनंतर प्रेक्षकांना ट्रेलरची आतुरता होती. या चित्रपटात यामी गौतम आणि भूमी पेडणेकर यांचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. यामीने आयुष्मानसोबत 'विकी डोनर' चित्रपटात भूमिका साकारली होती. तर, भूमीने त्याच्यासोबत 'दम लगाके हैशा' आणि 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात भूमिका साकारली होती. आता तिघेही 'बाला' चित्रपटात एकत्र आले आहेत.