मुंबई -अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच यामधील 'गबरू' गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात आयुष्मान समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनयासोबतच आयुष्मानला संगीताचीही आवड आहे. या चित्रपटातही त्याच्या आवाजातील एक गाणे प्रदर्शित केले जाणार आहे.
आयुष्मानने यापूर्वीही त्याच्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. 'विकी डोनर', 'ड्रीमगर्ल' या चित्रपटात त्याने गायलेली गाणी हिट ठरली होती. आता 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातही त्याच्या आवाजातील गाणं पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -गौरी खानच्या शानदार पार्टीत कलाकारांनी लावले चार चांद, पाहा फोटो