मुंबई -आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकरच्या 'बाला' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तब्बल तिसऱ्यांदा भूमी आणि आयुष्मान यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या इतर कलाकारांची नावेही जाहीर झाली आहेत. अभिनेत्री यामी गौतम ही देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
आयुष्मान-भूमीच्या 'बाला' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, 'ही' अभिनेत्रीदेखील साकारणार मुख्य भूमिका - sourabh shukla
आयुष्मान आणि भूमी यापूर्वी 'दम लगाके हैशा' आणि 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात झळकले होते. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. आता 'बाला' चित्रपटात पुन्हा एकदा त्यांची जोडी दिसणार आहे.
'स्त्री' चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक हे 'बाला' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात सौरभ शुक्ला, जावेद जाफरी आणि सीमा पाहवा हे कलाकार सहाय्यक भूमिकेत असणार आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या पहिल्या शॉटचा एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
आयुष्मान आणि भूमी यापूर्वी 'दम लगाके हैशा' आणि 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात झळकले होते. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. आता 'बाला' चित्रपटात पुन्हा एकदा त्यांची जोडी दिसणार असल्यामुळे चाहत्यांची या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. दिनेश विजान हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.