मुंबई - आज देशभरात दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. बॉलिवूड कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेता आयुष्मान खुरानानेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्याची ही पोस्ट चाहत्यांना विचार करायला भाग पाडणारी आहे.
आयुष्मान खुरानाने एक कविता त्याच्या पोस्टमध्ये शेअर केली आहे.
हेही वाचा - ...म्हणून रणवीरवर रागावली धोनीची मुलगी, धोनीने उलगडला किस्सा
आयुष्मानसोबतच बॉलिवूडच्या इतरही कलाकारांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन अक्षय कुमार, तापसी पन्नु, करण जोहर, जुही चावला, अर्जुन कपूर, हेमा मालिनी, अनुष्का शर्मा यांनीही पोस्ट शेअर करुन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -आयुष्मान खुराना, रणवीर सिंगवर अक्षयच्या 'बाला'ची क्रेझ, पाहा व्हिडिओ