मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची मुख्य जोडी असलेला 'दम लगाके हैशा' या चित्रपटाला आज पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटातून भूमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटातच भूमीने स्थूल शरीर असलेल्या महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर आयुष्मान आणि भूमीच्या चित्रपट करिअरला नवी कलाटणी मिळाली.
भूमीने 'दम लगाके हैशा' या चित्रपटासाठी तब्बल ३० किलो वजन वाढवले होते. या चित्रपटानंतर आयुष्मान आणि भूमीच्या जोडीची भरपूर प्रशंसा झाली होती. या चित्रपटानंतर दोघेही 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटातही दोघांच्या केमेस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली.
भूमीचा आत्ताचा जर लुक पाहिला तर, 'दम लगाके हैशा' चित्रपटातील हिच ती भूमी का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण, भूमीने आपल्या लुकवर प्रचंड मेहनत घेत आता एकदम फिटेस्ट अभिनेत्री बनली आहे. फॅट टू फिटच्या या प्रवासात कधी तिने आपल्या वयापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीचीही भूमिका साकारली. 'सांड की आँख' या चित्रपटात ती शूटर दादीच्या भूमिकेत झळकली. या चित्रपटातही तिचा लुक सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता.
हेही वाचा -'ती' गोष्ट आठवली की अजूनही भीती वाटते, भाग्यश्रीने शेअर केली कटू आठवण