महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनुभव सिन्हाच्या आगामी चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आयुषमान - police

पोलिसाच्या भूमिकेतील हा त्याचा पहिलाच चित्रपट ठरणार आहे

आर्टिकल १५

By

Published : Mar 6, 2019, 12:56 PM IST

मुंबई- विकी डोनर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आयुषमान खुराणाने काही काळातच प्रचंड प्रसिद्धी मिळवली. २०१८ मध्ये आलेल्या त्याच्या अंधाधून आणि बाधाई हो चित्रपटांने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. यानंतर आता आयुषमान लवकरच अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'आर्टिकल १५' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. या चित्रपटात आयुषमान एका पोलिसाच्या भूमिकेत असणार आहे. पोलिसाच्या भूमिकेतील हा त्याचा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. चित्रपटात आयुषमानशिवाय ईशा तलवार, मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमूद मिश्रा आणि मोहद झिशान अय्युब या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाच्या चित्रीकरणाला १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. सध्या लखनऊमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. याबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. यासोबतच चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूकही शेअर करण्यात आला आहे. आर्टिकल १५ शिवाय तो लवकरच 'ड्रीम गर्ल' आणि 'बाला' या चित्रपटातही झळकणार असून 'ड्रीम गर्ल'चे चित्रीकरण सध्या सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details