मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लवकरच 'हाऊसफुल ४' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील दोन गाणी आत्तापर्यंत प्रदर्शित झाली आहेत. अलिकडेच अक्षयचं 'बाला' गाणं रिलीज करण्यात आलं. या गाण्यात अक्षयचा धमाल अंदाज पाहायला मिळतो. अभिनेता आयुष्मान खुराना आणि रणवीर सिंग यांच्यावरही या गाण्याची क्रेझ तयार झाली आहे. दोघांनीही मजेदार व्हिडिओ शेअर करून अक्षयच्या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आयुष्मान खुराना आता 'ड्रीमगर्ल'नंतर 'बाला' चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच 'बाला'चा टीजर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आयुष्मान केस टक्कल असलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने 'बाला' गाणं शेअर केल्यानंतर लगेचच आयुष्मानने व्हिडिओ शेअर करून अक्षयला म्हटलं, की 'तू बालाला बोलावलं आणि 'बाला' आला'.
हेही वाचा -'शैतान का साला' बनुन 'हाऊसफुल ४'चा 'बाला' प्रेक्षकांच्या भेटीला, नवं गाणं प्रदर्शित