मुंबई -बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता आयुष्मान खुरानाच्या चित्रपटांची विशेष क्रेझ पाहिली जात आहे. अल्पावधितच त्याने आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. यावर्षी त्याच्या 'ड्रीमगर्ल' चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर तो 'बाला' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर घोडदौड करण्यास सुरुवात केली आहे.
'बाला' चित्रपट हा टक्कल असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित आहे. केस नसल्यामुळे आलेल्या न्युनगंडावर बाला कशाप्रकारे मात करतो, याची मनोरंजक कथा यामध्ये पाहायला मिळते. या चित्रपटात फक्त टक्कल असलेल्या व्यक्तीचीच नाही, तर सौंदर्याच्या निकषांचीही कथा पाहायला मिळते. त्यामुळे मनोरंजनासोबत सामाजिक संदेशही या चित्रपटातून दिला गेला आहे.
हेही वाचा -'तान्हाजी'च्या निमित्ताने अजयच्या चित्रपटाचं शतक, पाहा खास व्हिडिओ