मुंबई- 'बधाई हो' आणि 'अंधाधून' या चित्रपटांना मिळालेल्या अफलातून यशानंतर आयुष्मान खुराना पुन्हा एकदा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कथा चांगली असेल, तर अल्प बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवू शकतात, हे आयुष्मानने सिद्ध केले आहे. आता 'ड्रिम गर्ल' या चित्रपटातून पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक राज शांडिल्य यांच्या 'ड्रिम गर्ल' चित्रपटात आयुष्मान चक्क स्त्रियांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तो राधा, सीता आणि द्रोपदीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एका माध्यमाशी बोलताना दिग्दर्शक राज यांनी सांगितले होते, की 'या चित्रपटाच्या कथानकाबद्दल मी फार काही सांगू शकत नाही. मात्र, चित्रपटाच्या पोस्टरवरून चाहत्यांना कथेचा अंदाज लावता येऊ शकेल. या चित्रपटात आयुष्मान रामायणाची सीता, महाभारताची द्रोपदी आणि क्रिश्न लीलामधील राधेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे'.