महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच 'ड्रीमगर्ल'ची धमाल पार्टी, पाहा गाणं - अंधाधून

आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांच्या पार्टी साँगची सोशल मीडिया आणि यूट्यूबवर चांगलीच धूम आहे. 'गट गट' असं या गाण्याचं नाव आहे. या पंजाबी पार्टी सॉन्गमधील व्हिडिओत नुसरत आणि आयुष्मानच्या डान्स मूव्ह्ज पाहण्यासारख्या आहेत.

प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच 'ड्रीमगर्ल'ची धमाल पार्टी, पाहा गाणं

By

Published : Sep 12, 2019, 5:48 PM IST

मुंबई -आयुष्मान खुरानाचा बहुचर्चित असलेला 'ड्रीमगर्ल' उद्या म्हणजेच १३ सप्टेंबरला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या पोस्टरपासून ते ट्रेलरपर्यंत सर्वच गोष्टींनी चाहत्यांवर भूरळ पाडली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर तर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया आल्या आहेत. याशिवाय या ट्रेलरला २५ मिलियनपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. आता नुकतंच या चित्रपटातलं पार्टी साँग प्रदर्शित झालं आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच 'ड्रीमगर्ल'ची टीम या गाण्यात धमाल पार्टी करताना पाहायला मिळते.

आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांच्या पार्टी साँगची सोशल मीडिया आणि यूट्यूबवर चांगलीच धूम आहे. 'झी म्युझिक' कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर हे पार्टी सॉन्ग रिलीज करण्यात आलं. 'गट गट' असं या गाण्याचं नाव आहे. या पंजाबी पार्टी सॉन्गमधील व्हिडिओत नुसरत आणि आयुष्मानच्या डान्स मूव्ह्ज पाहण्यासारख्या आहेत.

हेही वाचा -मुंबईत बाप्पाच्या दर्शनासाठी कलाकारांची मांदियाळी

आयुष्मानने आत्तापर्यंत 'विकी डोनर', 'दम लगाके हैशा', 'शुभ मंगल सावधान', 'अंधाधून', 'बधाई हो' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आता त्याच्या 'ड्रीमगर्ल'साठी चाहते आतुर आहेत.

हेही वाचा -सारागढीच्या युद्धाची १२२ वर्ष, अक्षयनं शेअर केली पोस्ट

'ड्रीमगर्ल'ची स्पेशल स्क्रिनिंगही अलिकडेच आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे चित्रपट समीक्षकांनीही चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे. शिवाय आयुष्मान खुरानाच्या अभिनयाचीही प्रशंसा केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाला ४ स्टार्स देत चित्रपट प्रेक्षकांची नक्की मने जिंकणार, अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांचा या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

हेही वाचा -आयुष्यात मी खूप काही चांगलं केलं असेल म्हणून तू भेटली, भावी पत्नीसाठी सिद्धार्थची पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details