मुंबई -अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' येत्या शुक्रवारी म्हणजे २८ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल फार उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
आयुष्मानचा 'आर्टिकल १५' प्रदर्शनासाठी सज्ज, नवं पोस्टर प्रदर्शित - sayani gupta
आयुष्मान सोबत या चित्रपटात इशा तलवार, मनोज पाहवा, सायनी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद झिशान आयुब हे कलाकार झळकणार आहेत.
आयुष्मानचा 'आर्टिकल १५' प्रदर्शनासाठी सज्ज, नवं पोस्टर प्रदर्शित
हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 'आता बदल घडवणार', अशी टॅगलाईन देत नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अनुभव सिन्हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, फॉक्स स्टुडिओअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
आयुष्मान सोबत या चित्रपटात इशा तलवार, मनोज पाहवा, सायनी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद झिशान आयुब हे कलाकार झळकणार आहेत.