महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अॅव्हेंजर्स एन्डगेम'ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री, पहिल्याच दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला - marvel

भारतात या सिनेमाचा उत्साह अगदी दांडगा आहे. या सिनेमाचे सुमारे १ मिलियन तिकीट प्रीबुक झाले आहेत.

'अॅव्हेंजर्स एन्डगेम'ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री

By

Published : Apr 26, 2019, 2:41 PM IST

मुंबई -मार्व्हल चाहत्यांची उत्सुकता शिगेला नेणारा 'अॅव्हेंजर्स एन्डगेम' अखेर चित्रपट गृहात दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच अनेक विक्रम मोडणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी घोडदौड सुरू केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाईला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडेदेखील समोर आले आहेत.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'अॅव्हेंजर्स एन्डगेम'ने तब्बल १४०० कोटींची कमाई केली आहे. केवळ चीनमध्ये सिनेमाला ५४५ कोटी ५४ लाखांची कमाई करण्यात यश आले आहे. भारतात या सिनेमाचा उत्साह अगदी दांडगा आहे. या सिनेमाचे सुमारे १ मिलियन तिकीट प्रीबुक झाले आहेत.

'अॅव्हेंजर्स एन्डगेम' या सिनेमात रॉबर्ट डाउनी जूनियर, क्रिस इवांस, मार्क रफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट जोहानसन, जेरेमी रेनर, पॉल रड आणि ब्री लार्सन यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details