मुंबई -अभिनेते अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांची जोडी असलेला 'प्रवास' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्यूझिक लॉन्च सोहळा पार पडला. या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ यांची बऱ्याच दिवसानंतर भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं शिर्षक गीत अलिकडेच प्रदर्शित झालं आहे. यामध्ये अशोक सराफ-पद्मिनी कोल्हापुरे यांची खास केमेस्ट्री पाहायला मिळते.
श्रेया घोषालच्या आवाजात अशोक सराफ-पद्मिनी कोल्हापुरे यांचा रोमॅन्टिक 'प्रवास' - #prawas
श्रेया घोषालने हे शिर्षक गीत गायलं आहे. तर सलीम-सुलेमान यांच्या जोडीने या गाण्याला संगीत दिलं आहे.

श्रेया घोषालच्या आवाजात अशोक सराफ - पद्मिनी कोल्हापुरे यांचा रोमॅन्टिक 'प्रवास'
श्रेया घोषालने हे शिर्षक गीत गायलं आहे, तर सलीम-सुलेमान यांच्या जोडीने या गाण्याला संगीत दिलं आहे.
'जे शेष आहे ते विशेष आहे', अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उर्वरित आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोण मिळवून देईल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.