महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांचा चित्रपट पानिपतसाठी पुण्यात सत्कार - Panipat movie latest news

दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांना हिंदवी स्वराज महासंघकडून १२ जानेवारी २०२० रोजी सत्कार करुण मानवंदना देण्यात आली. पानिपत चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांचा इतिहास देशभर पोहोचवल्याबद्दल या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

Ashutosh Govarikar felicitate for Panipat
आशुतोष गोवारीकर सत्कार

By

Published : Jan 13, 2020, 4:18 PM IST


भारत देशात गेल्या ५०० वर्षात आपल्या हृदयात छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, अशा अनेक वीरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकांपासून जतन केल्या आहेत. अशीच एक पानिपतच्या लढाईची यशोगाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची पहिली-वहिली संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे सच्चे देशभक्त मराठा जे पानिपतच्या लढाईत प्राणपणाने लढले ज्यांनी आपली निष्ठा आणि शौर्याची कमाल मर्यादा गाठली, अशा ऐतिहासिक पानिपतच्या मोठ्या लढाईचे चित्रण मोठ्या पडद्यावर केले आहे.

आशुतोष गोवारीकर सत्कार

प्रत्येक मराठी माणसाला पानिपत हे भव्य युद्ध चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. चित्रपटात पानिपत युद्धाचे संपूर्ण चित्रण विषयाच्या प्रत्येक महत्वपूर्ण प्रसंग लक्षात घेऊन फक्त २ तास ३० मिनिटांत उलगडून दाखवला आहे.

आशुतोष गोवारीकर सत्कार

पानिपत बहुश्रुत पण आत्तापर्यंत कोणीही न दाखवलेले युद्ध हे एक प्रत्येक मराठी पालकाचे व वरिष्ठ नागरिकांचे कर्त्तव्य आहे की ही अव्यक्त गोष्ट आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला दाखवली पाहिजे. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की मराठे शौर्यने लढले पण हार झाली ती विश्वासघाताने, त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट सर्व मुलांना व नातवंडाना हा मराठ्यांचा पराक्रम दाखवला पाहिजे.

त्याच प्रमाणे भारताच्या चित्रपट इतिहासात दादासाहेब फाल्के महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिली वक्ती होते त्याच प्रमाणे पानिपत युद्धाचे जाहीर प्रदर्शन करण्याचा पहिला-वहिला प्रयन्त लंडन निवासित रोहित शेळाटकर आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी केला आहे.

दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर म्हणाले " सत्कार नेहमी होतात कधी ते अवार्ड स्वरुपात असतात कधी अन्य स्वरुपाने होत असतात. पण जेव्हा सत्कार तुमच्या मातीतून तुमच्या लोकांकडून पवित्र भावनेतून करण्यात येतो त्याला शब्द नसतात. या देशाने आणि महाराष्ट्राने जे प्रेम चित्रपट पानिपतला आणि आम्हाला दिले आहे ते खूपच विशेष आहे."

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा हा प्रामाणिक प्रयत्न पाहता संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या इच्छे नुसार त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. आशुतोष गोवारिकर यांना हिंदवी स्वराज महासंघ कडून १२ जानेवारी २०२० रोजी सत्कार करुण मानवंदना देण्यात आली.

१२ जनेवारी रोजी पानिपत च्या तिसऱ्या युद्धाला २६० वर्ष पूर्ण झाले असून , मराठ्यांच्या शौर्याला या प्रसंगी मानवंदना देण्यात आली. या वेळी पेशवे, मराठे आणि मराठा सरदार यांचे वंशज या समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details