महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आशा भोसलेंनी ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गायले उडत्या चालीचे गाणे - Asha Bhosle's new song

भारतीय चित्रपट क्षेत्रात जवळपास प्रत्येक भाषेतील चित्रपटासाठी आशाताई यांनी गाणी गायली आहेत. ‘हवाहवाई’ चित्रपटातील त्यांचे हे गाणे ऐकून त्या ८८ वर्षाच्या आहेत यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही इतक्या अप्रतिम पद्धतीनं आशाताईंनी गाणं गायलं आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून महेश टिळेकर यांनीच लिहिलेल्या गाण्याचे आशाजींच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

आशाताईंचा वाढदिवस साधेपणाने साजरा
आशा भोसलेंनी ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गायले उडत्या चालीचे गाणे

By

Published : Sep 11, 2021, 5:00 PM IST

नुकताच पद्मविभूषण आशा भोसले यांनी वयाची ८८ वर्षे पूर्ण केली. कोरोना काळात त्यांनी आपले कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला. लोणावळा येथील त्यांच्या फार्म हाऊस वर छोटेखानी समारंभात आशाजींचा ८८वा वाढदिवस साधेपणाने तरीही उत्साहात साजरा केला गेला. त्यांच्या नाती झानाई व रांजाई यांनी त्यांचा वाढदिवस स्पेशल केला असं त्या म्हणाल्या. जॅकी श्रॉफ, हरिहरन इत्यादी लोकांनी तिथे हजेरी लावली होती आणि सर्वांनी गाणी गात उत्कृष्ट भोजनाचा आनंद घेतला.

आशाताईंचा वाढदिवस साधेपणाने साजरा

त्याआधी आशाताईंनी ‘हवाहवाई' या आगामी मराठी चित्रपटासाठी स्वरसाज चढवला. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश टिळेकर करीत असून आशाताईंना गाण्यासाठी होकार देण्यात त्यांचा मोठा हात आहे. गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या, सदैव सळसळते उत्साही व्यक्तिमत्त्व असलेल्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८८व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी पुन्हा एकदा आवाज दिला आहे. महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी ‘हवाहवाई’ या चित्रपटातील उडत्या चालीचे गाणे आशाताईंनी गायलं असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर त्यांनी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.

आशा भोसलेंनी ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गायले उडत्या चालीचे गाणे

‘हवाहवाई’ या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनच्या विजय शिंदे यांनी केली आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून महेश टिळेकर यांनीच लिहिलेल्या ‘जगण्याची ही मजा घेऊया नव्याने, जाऊया पुढे पुढे साऱ्यांच्या साथीने दिशा नव्या वाटे हव्या, साद देती आता उडण्याची...' असे शब्द असलेलं गाणं आशाजींच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

आशा भोसलेंनी ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गायले उडत्या चालीचे गाणे

भारतीय चित्रपट क्षेत्रात जवळपास प्रत्येक भाषेतील चित्रपटासाठी आशाताई यांनी गाणी गायली आहेत. ‘हवाहवाई’ चित्रपटातील त्यांचे हे गाणे ऐकून त्या ८८ वर्षाच्या आहेत यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही इतक्या अप्रतिम पद्धतीनं आशाताईंनी गाणं गायलं आहे. बऱ्याच वर्षांनी आशाताईंनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायल्यानं स्वाभाविकपणे या गाण्याविषयी आणि महेश टिळेकर दिग्दर्शित ‘हवाहवाई’ चित्रपटाविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

आशा भोसलेंनी ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गायले उडत्या चालीचे गाणे

मल्टीस्टारकास्ट असलेल्या ‘हवाहवाई’ या चित्रपटात काही नवीन कलाकारांनाही संधी देण्यात आली असून सर्व कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा -प्रख्यात 'हिंदू' कादंबरीचा दुसरा भाग सहा महिन्यात वाचकांच्या हाती - भालचंद्र नेमाडे

ABOUT THE AUTHOR

...view details