महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आर्यन खानच्या आवाजात 'द लॉयन किंग'च्या 'सिंबा'ची झलक, पाहा व्हिडिओ - hollywood

आर्यनच्या आवाजाचे कलाक्षेत्रातून कौतुक केले जात आहे. करण जोहर, रणवीर सिंग आणि रितेश देशमुखने ट्विटरवरून आर्यनच्या आवाजाची प्रशंसा केली आहे.

आर्यन खानच्या आवाजात 'द लॉयन किंग'च्या 'सिंबा'ची झलक, पाहा व्हिडिओ

By

Published : Jul 11, 2019, 5:24 PM IST

मुंबई - हॉलिवूडच्या 'द लॉयन किंग' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या हिंदी व्हर्जनमध्ये शाहरुख खान यातील मुख्य पात्र 'मुफासा'ला आवाज देणार आहे. तर, 'सिंबा'च्या पात्राला शाहरुखचाच मुलगा आर्यन खानचा आवाज मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने त्याच्या आवाजातील 'मुफासा'चा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आर्यनचा आवाज ऐकण्याची चाहत्यांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे.

आर्यनच्या आवाजातील द लॉयन किंगचा नवा टीजर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या टीजरमध्ये आर्यनच्या आवाजाची झलक एकायला मिळते. शाहरुखने सोशल मीडियावर हा टीजर शेअर केला आहे. 'मेरा सिंबा', असे कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिले आहे.

आर्यनच्या आवाजाचे कलाक्षेत्रातून कौतुक केले जात आहे. करण जोहर, रणवीर सिंग आणि रितेश देशमुखने ट्विटरवरून आर्यनच्या आवाजाची प्रशंसा केली आहे.

शाहरुख आणि आर्यन व्यतिरिक्त आशिष विद्यार्थी (स्कार), आसरानी (जाजू), श्रेअस तळपदे (टीमॉन), संजय मिश्रा (पुंबा),नेहा गारगवे (नाला), सुनीधी चव्हान (व्होकल - नाला), शेरनाज पटेल (शराबी), अचिंत कौर (शेनजी) अरमान मलिक ( सिंबा- व्होकल) यांच्याही आवाजाची जादु अनुभवायला मिळणार आहे.
१९ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details