मुंबई -अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान - शर्माने काही दिवसांपूर्वी एका गोंडस परीला जन्म दिला आहे. तिने तिच्या मुलीचे नाव आयत असे ठेवले आहे. सलमान खानच्या वाढदिवशीच आयतचा जन्म झाला. त्यामुळे सलमान खानसाठी त्याचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरला. अर्पिताने सलमान खानच्या हातात असलेल्या आयतचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अर्पिता आणि आयुष शर्मा यांना आहिल नावाचा पहिला मुलगा आहे. सलमान खानच्या वाढदिवशी म्हणजे २७ डिसेंबरला अर्पिता दुसऱ्यांदा आई बनली.
अर्पिताने सलमान खानचा हा फोटो शेअर करून एक खास पोस्टही लिहिली आहे. सलमान खानसोबतच त्याची आई सलमा खान देखील या फोटोमध्ये पाहायला मिळतात. 'या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही, ज्याची मला भीती वाटेल. कारण, माझ्या पाठीशी तू आहेस. तू माझ्यासोबत काहीही वाईट होऊ देत नाही. आता आयतच्या डोक्यावरही तुझा आशिर्वाद आहे. ती देखील माझ्याप्रमाणेच तुझ्या सावलीत सुरक्षित आहे', असे अर्पिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.