मुंबई - बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खानचा आज ५४ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशीच त्याला खास गिफ्ट मिळाले आहे. सलमानची बहीण अर्पिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
अर्पिता आणि आयुषने काही महिन्यांपूर्वीच ही गोड बातमी दिली होती. त्यांचे हे दुसरे बाळ आहे. त्यांना अहिल नावाचा ३ वर्षाचा मुलगा देखील आहे. आता सलमानच्या वाढदिवशीच त्यांनी आपल्या मुलीचे स्वागत केले आहे.
हेही वाचा -Birthday Special: जाणून घ्या, सलमानला कसे गेले २०१९ साल
अर्पिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच, चाहत्यांचे आभारही व्यक्त केले आहेत.
अर्पिता आणि आयुषने २०१४ साली नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली होती. त्यांना २०१६ साली पहिला मुलगा झाला होता.
आयुषने 'लव्हयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्या या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता तो 'क्वाथा' चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. एका सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये तो कॅटरिना कैफची बहीण इझाबेला कैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
हेही वाचा -Flashback 2019: प्रेक्षकांवर प्रभाव टाकलेले मराठी चित्रपट