मुंबई -अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची मुलगी मायरा हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन भावनिक पोस्ट लिहिली आहे.
अर्जुन रामपालची भावनिक पोस्ट 'तूच माझं हास्य आणि तूच माझा आनंद आहेस', असे कॅप्शन देत त्याने त्याच्या मुलीसोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे.
अर्जुन रामपाल आणि त्याची पहिली पत्नी मेहर जेसिया यांना दोन मुली आहेत. महिका आणि मायरा अशी त्या दोघींची नावे आहेत. लग्नाच्या तब्बल २० वर्षानंतर अर्जन आणि मेहर दोघे ऐकमेकांपासून वेगळे झाले.
सध्या अर्जुन गॅब्रियेला डिमेट्रीयेडेस हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ती लवकरच आई बनणार आहे. लवकरच अर्जुन आणि गॅब्रियेला लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे.