मुंबई -बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून कॅटरिना कैफ हिला ओळखले जाते. सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. नेहमी ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील मिळाल्या. मात्र, यामध्ये अभिनेता अर्जुन कपूरने केलेली कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे.
कॅटरिनाच्या फोटोवर अर्जुनने एक गमतीशईर कमेंट केली. मात्र, कॅटरिनानेही त्याला चांगलेच उत्तर दिले आहे. कॅटने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कोणत्यातरी बीचवर उभी असलेली पाहायला मिळते. तिचा हा बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अर्जुनने तिची फिरकी घेतली. त्याने या फोटोवर कमेंट करत लिहिले की 'बघ तु कुठे जात आहेस, आशा करतो की पोज देताना त्या खांबावर आपटणार नाहीस'. त्याच्या या कमेंटवर कॅटरिनानेही प्रतिक्रिया दिली. 'मी याबाबत काळजी घेईल', असे ती म्हणाली.