मुंबई - द कपील शर्मा शोमध्ये हास्याचे फवारे उडवणारी अभिनेत्री अर्चना पुरण सिंग सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. आपल्या मुलाच्या भेटीसाठी ती इथे पोहोचली आहे. मुलगा आयुष्मान सेठी याच्यासोबतचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. याची कॅप्शन तिने लिहिलीय त्यावरुन ती थोडी उदास वाटत आहे.
मुलापासून दुरावण्याच्या विचाराने उदास दिसली अर्चना पुरण सिंग - Newyork
अभिनेत्री अर्चना पुरण सिंग मुलाच्या भेटीसाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचली आहे. मुलगा आयुष्मान सेठी याच्यासोबतचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. याची कॅप्शन तिने लिहिलीय त्यावरुन ती थोडी उदास वाटत आहे.
फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "न्यूयॉर्क डायरीज डे ७, उद्या मुंबईला परतायचे आहे. गुड बाय." सोशल मीडियावर फोटो शेअर करताना ती फारच भावुक झलेली दिसते. ती खूप दिवसांनी मुलगा आयुष्मान सेठीच्या भेटीसाठी गेली आहे. सुट्ट्या संपवून ती मुंबईला माघारी येत आहे. मुलाला सोडून परत येणे तिच्या जीवावर आलंय.
अर्चना पुरण सिंगने एक व्हिडिओदेखील शेअर केलाय. तो पाहून न्यूयॉर्कमधील तिची सुट्टी मस्त गेली असावी असे वाटते. इथे राहात असताना सोशल मीडियावर ती नेहमी आपले फोटो शेअर करीत होती.